वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, सिध्दार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आयोजित सलग 19 व्या रक्तदान शिबिरात 36 रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत रक्तदान केले.श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तपेढी सावंतवाडी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व गणेशपूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच शंकर घारे, माजी पंचायत समिती सभापती यशवंत परब, ग्रा.प सदस्य जयवंत तुळसकर, श्रध्दा गोरे, शीतल नाईक, सामाजिक कार्यकर्ते आनंद परब, तेजस माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. लादे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. सचिन परुळकर, उपाध्यक्ष नाना राऊळ व प्रदीप परुळकर, मंगेश सावंत, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग उपाध्यक्ष महेश राऊळ, साईप्रसाद भोई, सिध्दार्थ कलाविष्कार युवक मंडळाचे प्रतिनिधी साईराम तुळसकर, सुजाता पडवळ, मिलिंद शेटकर,अजय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी, रक्तदान सारख्या उपक्रमाचे आयोजन करून वेताळ प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत आहे. सद्यस्थितीत युवक समाजात दिशाहिन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायिक प्रशिक्षणे अशा समाजहिताचे उपक्रम राबवित आहे. सामाजिक उपक्रमासह कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमातहि योगदान उल्लेखनीय आहे. अशा प्रकारे आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम वेताळ प्रतिष्ठान करत असल्याचे सांगत प्रतिष्ठानचे कौतुक केले.