9 जून रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अली अब्बास जफरकडून दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्याचा इंटेन्स लुक दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये शाहिद अॅक्शनसीन्स करताना दिसून येत आहे. या चित्रपटात संजय कपूर व्हिलनच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात पोलीस, माफिया, ड्रग्स असे कंगोरे दर्शविणारी कहाणी रंगविण्यात आली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर चाहते शाहिदच्या या नव्या अवताराचे कौतुक करत आहेत. अली अब्बास जफरसोबत शाहिदचा हा पहिलाच चित्रपट आहे. शाहिदसोबत या चित्रपटात रोनित रॉय, राजीव खंडेलवाल आणि डायना पेंटी हे कलाकार दिसून येणार आहेत. ब्लडी डॅडी हा चित्रपट 9 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित फ्रेंच चित्रपट ‘निट ब्लँच’ (स्लीपलेस नाइट)चा हिंदी रिमेक आहे.
शाहिद याचबरोबर आगामी काळात क्रीति सेनॉनसोबत एका चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा रोमँटिक व्यक्तिरेखा साकारत आहे.