बेळगाव : केएलएस वसंतराव पोतदार अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेत ब्ल्यू लॉक, वेझर्ड, एफवायव्हीपीपी, फ्यूजन संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी वसंतराव पोतदार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. एस. मालाज, क्रीडा प्रभारी प्रतिक लोहार व प्राध्यापकवर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ब्ल्यू लॉक, वेझर्ड, एफवायव्हीपीपी, फ्यूजन, स्ट्रायकर्स या संघांचा समावेश होता. पहिल्या सामन्यात स्ट्रायकर्स संघाने एफवायव्हीपीपी संघाचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ब्ल्यू लॉक संघाने वेझर्ड संघाचा 5-0 असा पराभव केला. त्यात आशिष बुलबुलेने 3 तर तेजस पाटीलने 3 गोल केले. तिसऱ्या सामन्यात एफवायव्हीपीपी संघाने फ्यूजन संघाचा 1-0 असा पराभव केला. संकेतने एकमेव गोल केला. वेझर्ड संघाने स्ट्रायकर्स संघाचा 1-0 असा पराभव केला. वेझर्डतर्फे संतोषने गोल केला. पाचव्या सामन्यात ब्ल्यू लॉक व फ्यूजन यांच्यातील सामन्यात ब्ल्यू लॉकने 1-0 असा निसटता पराभव केला. इलानने एकमेव गोल केला. सहाव्या सामन्यात फ्यूजनने स्ट्रायकर्सचा 2-0 असा पराभव केला. श्रीननने 2 गोल केले.
Previous Articleअमन सुणगारची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
Next Article दिशा, आशुतोष यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.