पुलाची शिरोली / वार्ताहर
येथील बेपत्ता असलेल्या विजय आकाराम माळी वय. ४२, याचा मृतदेह सोमवारी सकाळी हेरले गावाच्या हद्दीत सापडला. शुक्रवारी विजय माळी व संतोष शिंदे हे दोघेजण वळीवडे धरणाजवळ पंचगंगा नदीत बुडाले होते. त्यांचा शनिवारी सकाळ पासून शोध सुरू झाला होता. शिरोली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लग तीन दिवस शोध मोहीम राबविली होती.
या पैकी शिंदेचा मृतदेह शनिवारी पंचगंगा नदीत सापडला होता. पण माळीचा शोध लागला नाही. वळीवडे धरणाजवळ पंचगंगा नदीत पाणबुड्यांच्या सहाय्याने सोमवारी सकाळी दहा वाजता पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली असता हेरले गावाच्या हद्दीत माळीचा मृतदेह सापडला. सायंकाळी सहा वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोध मोहीम राबविण्यासाठी शिरोली पोलीस ठाण्याचे स.पो.नि. पंकज गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.