जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते केला सत्कार
बेळगाव : मालदिव येथे झालेल्या द. आशियाई शरिरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या शरिरसौष्ठवपटूनी यश संपादन केलेल्या शरीरसौष्ठवपटूंचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते खास सत्कार करण्यात आले. मालदीव येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचे शरीरसौष्ठवपटू वेंकटेश ताशिलदार याने कास्यपदक, प्रविण कणबरकरने चौथा क्रमांक पटकाविला. या दोघांनी क्रीडा क्षेत्रात बेळगावचे नाव उज्वल केले आहे. त्याचप्रमाणे वयस्करांच्या गटात बेळगावचे प्रताप कालकुंद्रीकर व केतकी पाटील यांची नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी व दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा खास सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आशियाई पंच अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, सुनील राऊत आदी मान्यवरांच्याहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शरीरसौष्ठवपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.