विविध उपक्रमांचे आयोजन : नेत्रतपासणी-चष्म्यांचे वाटप : ज्येष्ठ महिला-नागरिकांचा सत्कार
बेळगाव : हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. तालुकाप्रमुख सचिन गोरले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहरप्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहरप्रमुख राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानिमित्त आयोजित नेत्रतपासणी व चष्मा वितरण शिबिरामध्ये महिला व पुरुषांनी सहभाग घेतला होता. यावेळी दत्ता पाटील, प्रकाश भोसले, निरंजन अष्टेकर, बाळासाहेब डंगरले, राजू कणेरी, विनायक बेळगावकर, महिपाल चित्तप्पाचे, माजी महापौर सरिता पाटील, डॉ. रवी पाटील, शरद पाटील यासह इतर उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे ज्येष्ठांचा सत्कार
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने गणेशपूर येथील शिवसेना कार्यालयात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात 25 ज्येष्ठ महिला व पुरुषांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंगला खामकर, रेखा हिरोजी, लक्ष्मीबाई देवरवाडी, मंजुळा देवरवाडी, गीता दळवी, वैशाली खामकर, इंदिरा घाटकर, प्रतिभा लोकरे, शंकर पाटील यासह इतर उपस्थित होते.
खडेबाजर येथील कार्यालयात आदरांजली
शिवसेनेच्या खडेबाजार येथील कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी शिवसेनाप्रमुखांचे सीमाभागासाठीचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी परशराम गोंदकर, विनायक कुंडेकर, अमोल मजुकर, हणमंत जुमण्णावर, अशोक देसाई यासह इतर उपस्थित होते.