संशोधनात चकित करणारा खुलासा
नैसर्गिक जग इतके सुंदर आहे की कुणालाही वेडं लावू शकते. परंतु हे जग अगणित रहस्यांनी भरलेले आहे. आतापर्यंत एक मादीच जन्म देऊ शकते असे ऐकलेले असेल. परंतु एक असाही नर जीव आहे, जो पिल्लांना जन्म देतो. सीहॉर्स (सागरी अश्व) वर करण्यात आलेल्या संशोधनात हा चकीत करणारा खुलासा झाला आहे. सिडनी विद्यापीठ आणि न्यू कॅसल विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
पाइपफिशच्या दोन प्रजातींमध्ये नर गर्भधारण करतात आणि पिल्लांना जन्म देत असल्याचे आढळून आले. नर सागरी अश्वाच्या शेपटीत मादीप्रमाणे गर्भाशयासारखी एक थैली असते, ज्यात तो वाढणाऱया भ्रूणांना ठेवत असतो. यात एक प्रकारचा प्लेसेंटा राहतो आणि तो विकसित होणाऱया भ्रूणाशी जोडलेला असतो. नर सागरी अश्व सस्तन प्राण्यांच्या आनुवंशिक गुणांनी भ्रूणांना पोषक घटक आणि ऑक्सिजन मिळतो. नर सागरी अश्वात अद्वितीय शरीर रचना असते, ज्याचा वापर तो पिल्लांना जन्म देण्यासाठी करतो.
या संशोधनात आगामी काळात बायोमॅकॅनिकल आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजिकलच्या अध्ययनात मोठी मदत मिळू शकते असे संशोधकांचे मानणे आहे. पिल्लांना जन्म देण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल असते. या प्रक्रियेत मादी गर्भवती जीवांमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोनद्वारे नियंत्रित केली जाते. ऑक्सिटोसिनमुळे गर्भाशयाच्या स्नायूंमधील आंकुचन वाढते आणि यामुळे प्रसूतीवेदना होत असते. संशोधकांनी सागरी अश्वाला ऑक्सिटोसिनच्या संपर्कात आणले असता सागरी अश्वाची प्रसूती मादी सस्तन प्राण्यांप्रमाणेच होत असल्याचा खुलासा झाला.