बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव शहर तालुकास्तरीय मुलामुलींची क्रिकेट निवड चाचणी मोठ्या उत्साहात पार पडली. सेंट मेरीज स्कूलच्या मैदानावर आयोजिलेल्या या क्रिकेट निवड चाचणीचे उद्घाटन टिळकवाडी विभागाचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिन कुडची, किरण तारळेकर, बापु देसाई, प्रकाश बजंत्री आदी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. सदर निवड चाचणीत टिळकवाडी विभाग, कॅम्प, शहापूर, महांतेशनगर विभाग येथून 72 खेळाडूनी भाग घेतला होता.
मुलांच्या विभागात निवडण्यात आलेल्या 16 खेळाडूंचा संघ पुढीलप्रमाणे-सुमित भोसले (भातकांडे), आशुतोष हिरेमठ (सेंट झेवियर्स), सिध्दांत करडी (सेंट पॉल्स), संचित सुतार (टिळकवाडी), लाभ वेर्णेकर व स्वयम व•sबैलकर (दोघेही सेंट झेवियर्स), श्रेयस आनंदाचे (वनिता), वरद साखळकर (हेरवाडकर), सोहम पाटील (केएलएस), स्वरूप साळुंखे (सेंट पॉल्स), वेदांत कोकितकर (वनिता), सुप्रित गेंजी (भरतेश), साईराज साळुंखे (सेंट पॉल्स), वरद सुर्यवंशी (संत मीरा), लक्ष वेर्णेकर (सेंट झेवियर्स), सुरेंद्र पाटील (केएलएस) तर राखीव खेळाडू अनमोल शिंदोळकर (सेंट झेवियर्स), मुद्दसर बाडीवाले (वनिता), सुनित तेलगेरी (भरतेश), अथर्व चिवटे (केएलएस), सुमोग बडकर (सेंट पॉल्स).
मुलींचा विभाग : श्रेया पोटे (महिला विद्यालय), जोया काजी, गिरीजा कुंदप, अनुजा हुंदरे, मनस्वी अंगडी सर्व (वनिता विद्यालय), गार्गी बालगीकर (महिला विद्यालय), ज्ञानेश्वरी धुडूम (वनिता), किर्ती अरसेकर, आरती मोरे, भूमिका कंबार, माही कंग्राळकर, हर्षदा सी, (सर्व वनिता विद्यालय), निधी पाटील (महिला विद्यालय), आरती कदम, अवनी एकलासपूर दोघे ही (सेंट मेरीज), वैष्णवी पाटील (भरतेश) तर राखीव खेळाडू म्हणून रितु बोगार (भरतेश), मानवी मारिहाळ व रक्षता रजपूत दोघेही (ज्ञान मंदिर) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडसाठी विवेक पाटील, सचिन कुडची, किरण तारळेकर, मारूती मगदूम, बापू देसाई, प्रकाश बजंत्री, पिल्ले यांनी काम पाहिले.