व्हिडिओ पाहून चकित व्हाल
पॅराग्लायडिंग हा लोकप्रिय साहसी क्रीडाप्रकार आहे. पॅराशूट आणि योग्य त्या सुरक्षेच्या मदतीने पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्ती या अद्भूत क्रीडाप्रकारचा आनंद घेत असतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल असून तो उंच आकाशात पॅराग्लायडिंग करता करता चक्क नाश्ता करतानासुद्धा दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओ पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका साहसी तरुणाचा आहे. तरुणाने पॅराग्लायडिंग करताना बेल्ट बॅग कंबरेला अडकविली असून त्यातून नाश्ता करण्याचे पदार्थ आणले होते. तरुण पॅराग्लायडिंग करताना बॅगमधून कॉर्नफ्लेक्स बाहेर काढतो, त्यानंतर एक प्लास्टिक बाउल काढून त्यात चमच्याने केळ्याचे तुकडे करून टाकतो. केळं कापताना एक तुकडा खालीसुद्धा पडतो. तसेच त्यानंतर तो त्यात दूध ओततो. अशाप्रकारे तरुणाचा नाश्ता तयार होतो आणि मग तो ते खाण्यास सुरुवात करतो. जमिनीवर उतरण्यापूर्वी हा तरुण उंच आकाशात नाश्ता करताना दिसून आला आहे.
या तरुणाचे नाव ओस्मार ओचाओ आहे. उंच आकाशात पॅराग्लायडिंग करताना ओस्मार अत्यंत बिनधास्तपणे नाश्त्याचा आनंद घेत होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यावर एका युजरने ‘दिवस सुरू करण्याचा उत्तम मार्ग’ अशी टिप्पणी केली आहे. तर अनेक जण त्याच्या हिमतीची दाद देत आहेत.