बांधकाम खात्याकडून होणार 22 कोटी खर्च
पणजी : राज्यातील सर्व लहान-मोठे पूल आणि साकव यांची सार्वजनिक बांधकाम खात्यातफ्xढ तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 22 कोटी ऊपये खर्च होणार आहेत. या कामाकरीता लवकरच निविदा जारी करण्यात येणार असून त्या कामातून खात्याला पुलांची व साकवांची सध्या नेमकी स्थिती काय आहे, हे कळणार आहे. खात्याच्या हिशोबाने अशा प्रकारची एकूण 2000 पेक्षा अधिक बांधकामे राज्यात असून त्यांची पहाणी, तपासणीनंतर कोणते पूल, साकव कमकुवत आहेत याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यातून जुने कमकुवत पूल, साकव यांची दुरूस्ती करण्यात येईल किंवा ते मोडून नवीन बांधण्याचा खात्याचा विचार आहे. पूल, साकव यांची पाण्यातील बांधकामाची स्थिती तपासण्यात येणार असून पाया मजबूत आहे की नाही याची चाचणी होणार आहे. राज्यात अनेक वर्षांचे जुने पूल, साकव आहेत. त्यांची तपासणी फ्ढारशी झालेली नाही. काहींचे बांधकाम तर मोडकळीस आले असून ते कधीही कोसळतील अशी स्थिती आहे. प्रत्येक गावात, शहरात एक तरी किंवा त्यापेक्षा अधिक पूल, साकव आहेत. त्या सर्वांचे निरीक्षण आता बांधकाम खाते करणार आहे. त्यातून किती पूल, साकव मजबूत आहेत आणि किती मोडकळीस आलेले आहेत याची माहिती समोर येणार आहे.