खडतर परिस्थितीतून मिळविले यश
Brilliant performance of Sindhudurg team in state level rock ball tournament
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वताकडे खर्चासाठी आवश्यक पैसे नसताना फिरून लोकवर्गणी जमा करून ग्रामीण भागातील युवकाच्या सिंधुदुर्ग संघाने मातब्बर संघाशी लढत देत सोलापूर येथील राज्यस्तरीय रॉक बॉल स्पर्धेत उपविजेते पद पटकावले. अंतिम सामन्यात या संघाने नवी मुबई संघाशी लढत दिली. या यशाबद्दल सर्व स्तरातून या खेळाडूचे अभिनंदन. होत आहे. बिबवणे ( ता.कुडाळ ) या गावात या संघातील खेळाडूचे जंगी स्वागत करण्यात आले
दरम्यान या खेळाडूंनी सिंधुदूर्ग जिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तेही शासकीय मदत नसताना मिळविलेले हे यश वाखण्याजोगे आहे. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्यावी,अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य रॉकबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सोलापूर शहर व जिल्हा रॉकबॉल ॲम्युचर स्पोर्टस् असोसिएशन ( सोलापूर ) सोलापूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कर्णधार – कृष्णा ( गौरव ) वेंगुर्लेकर , उपकर्णधार रोहित नाईक,नारायण ( भाऊ ) चव्हाण ,विशाल सावंत,अभिजित चव्हाण ,संकेत चव्हाण,शुभम चव्हाण ,अनिस देऊलकर ओम वेंगुर्लेकर ( सर्व बिबवणे ,ता.कुडाळ ) ,सक्षम ( बंटी ) धुरी ( पिंगुळी , ता.कुडाळ ) ,ऋषिकेश तेरेखोलकर ( वेंगुर्ले ) ,वासुदेव ( रुपेश ) कोनकर ( कोचरे, ता.वेंगुर्ले ) ,प्रशिक्षक प्रसाद ( बंटी ) कोरगावकर ( बिबवणे ) आदीं युवकांचा या संघात समावेश होता. या संघाने स्पर्धेत अनुक्रमें बीड , ठाणे ,मुबई शहर,सोलापूर व अहमदनगर अशा पाच संघाचा पराभव केला.