कट्टा / प्रतिनिधी
तीन विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती
श्रेया समीर चांदरकर -ग्रामीण सर्वसाधारण मधून मालवण तालुक्यात दुसरी व जिल्ह्यात अकरावी
अमृत विठ्ठल गावडे -ग्रामीण खुल्या गटात जिल्हात सहावा
जान्हवी भोसले -जिल्ह्यात 65 वी
राज्यस्तरावर इ.आठवीचा निकाल15.60% व इ.पाचवीचा निकाल केवळ 22.31 एवढा लागला असताना देखील प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश स्पृहणीय आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा 2023 च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी शासनाच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. श्रेया समीर चांदरकर (इयत्ता आठवी)ही विद्यार्थिनी ग्रामीण सर्वसाधारण यादीमधून तालुक्यात दुसरी तर जिल्ह्यात अकरावी आली .
अमृत विठ्ठल गावडे (इयत्ता आठवी)हा विद्यार्थी ग्रामीण खुल्या गटातून जिल्ह्यात सहावा आला.जानवी बापू भोसले (इयत्ता पाचवी )ग्रामीण खुल्या गटातून जिल्ह्यात 65 वी आली .या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेचवराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नवनीत सोमनाथ परब(इ.आठवी) तालुक्यात प्रथम व जिल्हा सातवा आला याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय सुनील नाईक, विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर ,डॉक्टर सोमनाथ परब मुख्याध्यापक संजय नाईक, ऋषी नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे ,इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त -कर्नल शिवानंद वराडकर (सेवानिवृत्त)अॅड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष- आनंद वराडकर ,शेखर पेणकर, सहसचिव साबाजी गावडे व सर्व सन्माननीय संचालक, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल फणसेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.