बबन साळगावकर यांची मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी
मुंबई ,ठाणे ,पुणे, नागपूर येथील कमर्शियल कॉम्प्लेक्स टॉवर रेसिडेन्सी टॉवर्स मध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी ठेवण्याचा कायदा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सर्व आमदारांनी एकत्र येऊन करावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. गेले अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम संत गतीने सुरूआहे. त्यातीलच एक सुप्त गतीने टॉवर्समध्ये मराठी माणसाला सदनिका शॉपिंग गाळे नाकारून परप्रांतीय बिल्डर लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाने असा कायदा करून सक्तीने प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये 50 टक्के आरक्षण मराठी माणसांसाठी देण्याची बंधन घालावे. आज मुंबईमध्ये मराठी मनुष्य उपनगरामध्ये दिसत आहे. काही दिवसानंतर मुंबईत मराठी माणसे शोधावी लागतील. मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी मराठी माणसांसाठी कायदा तयार करून महाराष्ट्रातील मराठी माणसांना दिलासा द्यावा. मुंबईतील टॉवर्स कॉम्प्लेक्स ,शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये 50% सदनिका गाळे मराठी माणसांसाठीच खरेदी करता येतील अशा स्वरूपाचा कायदा महाराष्ट्र विधिमंडळाने करावा . असे ते म्हणाले