क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गुजरात येथे 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत ज्युडो प्रकारात बेळगावच्या मलप्रभा जाधवने 48 किलो वजनी गटात चार फाईटमध्ये विजय संपादन करून कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत दिल्लीच्या ज्युडोपटूने 5 पैकी 5 फाईट जिंकून सुवर्ण तर मणिपूरच्या ज्युडोपटूने 5 पैकी 4 फाईट जिंकून रौप्यपदक पटकाविले.
36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या मलप्रभा जाधवने पहिल्या फाईटमध्ये मणिपूरच्या, दुसऱया फाईटमध्ये त्रिपुराच्या, तिसऱया फाईटमध्ये मणिपूरच्या दुसऱया ज्युडोपटूचा तर चौथ्या फाईटमध्ये आसामच्या ज्युडोपटचा पराभव करून कांस्य पदक मिळविले. दिल्लीच्या ज्युडोपटूने सुवर्ण तर मणिपूरच्या ज्युडोपटूने रौप्य पदक मिळविले. मलप्रभा जाधव सध्या बेंगळूरमधील डीवायईएस येथे सराव करीत असून, तिला ज्युडो प्रशिक्षक त्रिवेणी सिंग, जितेंद्र सिंग यांचे बहुमोल मार्गदर्शन तर वडील यल्लापा, आई शोभा, भाऊ मोहन जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.