ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थांची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करून पाडले. या ड्रोनने वाहून आणलेला 3.2 किलोचा हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 21 कोटी रुपये आहे.
Border Security Force shoots down Pakistani drone near International Border in Punjab's Amritsar; seizes over 3 kg heroin
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2023
बीएसएफचे डीआयजी संजय गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून भारतीय हद्दीत अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. राजस्थान, गुजरात, पंजाबची सीमा ओलांडून पाकिस्तानी अमली पदार्थांची तस्करी करत आहेत. असे प्रयत्न लष्कराने अनेकदा हाणून पाडले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून असे ड्रोन सीमेवर घिरटय़ा घालताना दिसून येत होते. भारताच्या हवाई हद्दीत आलेले एक ड्रोन आज सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करुन पाडले. या ड्रोनने वाहून आणलेली हेरॉईनची तीन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यामधील हेरॉईनचे वजन 3.2 किलो आहे. गेल्या दोन दिवसात बीसएफच्या जवनांनी अशा प्रकारचे चार ड्रोन पाडले आहेत.