वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या मुंबई सिटी एफसी संघाला प्रमुख प्रशिक्षक डेस बकींगहॅम यांचे मार्गदर्शन लाभले होते. पण आता 38 वर्षीय बकींगहॅम यांनी आपल्या प्रशिक्षक पदाचा स्वखुशीने त्याग करण्याचे ठरविले आहे. बकींगहॅम यांनी इंडियन सुपर लीग स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाला निरोप देत आता ते इंग्लिश प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या ऑक्सफर्ड युनायटेड क्लबमध्ये दाखल होत आहेत. आता मुंबई सिटी एफसी फुटबॉल क्लब नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. 2021 साली बकींगहॅम हे मुंबई सिटी संघात प्रशिक्षक म्हणून दाखल झाले होते.