गवळी बांधवांमध्ये उत्साह ः विविध भागात आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
वसुबारसच्या दिवशी गाय, वासराची पूजा झाल्यानंतर पाडव्यादिवशी शहरात सजविलेल्या म्हशींची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. दरवषी गवळी बांधव पारंपरिक पद्धतीने म्हशींना सजवून या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
दुभत्या जनावरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरातील विविध भागात या मिरवणुकीचे आयोजन केले जाते. गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कॅम्प परिसर, कोनवाळ गल्ली, नानावाडी यासह वडगाव येथील पाटील गल्ली, रयत गल्ली आणि चव्हाट गल्लीतदेखील मिरवणूक काढली जाते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ही मिरवणूक मर्यादित स्वरुपात झाली होती. मात्र, यंदा कोरोना संकटानंतर या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गवळी बांधवांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त शहर परिसरात दरवषी गवळी बांधवांकडून म्हशींना सजवून पळविले जाते. म्हशींच्या शिंगांना रंग, रिबन आणि गोंडे व गळय़ात साखळय़ा, पायात गोंडे बांधून म्हशींना सजविले जाते. शहरातील पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसी गल्ली, चव्हाट गल्ली आदी ठिकाणी म्हशींची मिरवणूक निघणार आहे. याबरोबरच दुचाकीच्या पाठीमागून म्हशी पळविण्याचा थरार पाहायला मिळणार आहे. सकाळी म्हशींची पूजा करून त्यानंतर म्हशी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती गवळी बांधवांनी दिली.