ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Bullet trains will run in the country from 2026 देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 पासून धावणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीअहमदाबादमध्ये केली.
देशात बुलेट ट्रेनचे ट्रॅक 92 पिलर तयार करण्यात आले असून, 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू आहे. अहमदाबाद रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई-नागपूर दरम्यान झालेल्या समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेन नेता येईल का, याचीही चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी या मार्गाची पाहणी केली.
अधिक वाचा : लडाखमध्ये भूस्खलन, 6 जवानांना वीरमरण
वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत वैष्णव म्हणाले, देशातील सर्व रेल्वे ट्रॅक अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे गुरांचा प्रश्न कायम आहे. तथापि, अशा समस्यांना तोंड देण्यासाठी गाडय़ा तयार केल्या जात आहेत. कालच्या घटनेनंतरही वंदे भारत ट्रेनला काहीच झाले नाही. पुढचा भाग दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.