IPL मध्ये 65 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गोलंदाज बुमराहने एक अनोखा विक्रम केला आहे. त्याने T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर हा त्याचा 250 वा बळी आहे.
206 टी-20 सामन्यात बुमराने ही कामगिरी केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात त्याचबरोबर भारतासाठी खेळलेल्या टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
T-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –
➤ जसप्रीत बुमराह – 250 विकेट्स
➤ भुवनेश्वर कुमार – 223 विकेट्स
➤ जयदेव उनाडकट – 201 विकेट्स
➤ विनय कुमार – 194 विकेट
➤ इरफान पठाण – 173 विकेट्स