बेळगाव : टीव्ही सेंटर परिसरातील एका बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरातील किमती ऐवज पळविण्यात आला आहे. शुक्रवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. अनिकेत यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. अनिकेत आपल्या घराला कुलूप लावून बेंगळूरला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आहे. घरातील दागिने पळविल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रमेश अवजी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनांनी परिसरात खळबळ माजली आहे.
Previous Articleजात-उत्पन्नाचा दाखला आता झटपट
Next Article झोपेतच पीएसआयचा हृदयविकाराने मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.