जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील डफळापूर येथे चोरट्यांनी बाहेरून कुलूप लावलेली दोन घरे फोडून ४लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी घडली असलीतरी रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.
ग्रामपंचायत समोरील विठ्ठल (बाळासाहेब) चव्हाण व बाज रोडवरील (महावितरण ऑफिस समोरील ) राहणारे जंगलूद्दीन पठाण यांचे ४.५० लाख रूपये रोख असा ४.७० हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब चव्हाण यांच्या आईंना कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळ काढला आहे. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
त्यानंतर पुढे महावितरण कार्यालयासमोरून बाजकडे जाणाऱ्या रोडवरील जंगलूद्दीन पठाण यांचे बंद घराचा दरवाज्या तोडून आतमध्ये प्रवेश करत तिजोरीतील तब्बल ४.५० हजार रूपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला. जंगलूद्दीन पठाण कंटबिय हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. सकाळी चोरी झाल्याचे त्यांना कळाले. घरासमोरचं बाळासाहेब चव्हाण यांची चोरलेली मोकळी पाकिटे चोरट्यांनी टाकली होती.
दरम्यानच्या रस्त्यावर राजू महाजन यांच्या दुकानसमोरील सिसिटिव्हीत घटनेच्या वेळेत दोघे चोरटे जाताना कैद झाले आहेत.पो.नि. रामाघरे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकालाही प्राचारण करण्यात आले होते. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.