बेळगाव : बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. पिरनवाडी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पिरनवाडी येथील दिलशाद महमदरसूल मुजावर या गुरुवारी रात्री आपल्या घराला कुलूप लावून जवळच असलेल्या आईच्या घरी गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्या आपल्या घरी परतल्या. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, 15 तोळे चांदी व 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे दीड लाखाचा ऐवज पळविला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleवीजबिल भरमसाट…ग्राहक भुईसपाट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.