वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांची नीति आयोगाचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वीचे सीईओ परमेश्वरन अय्यर यांची जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आल्यामुळे आता सुब्रह्मण्यम त्यांची जागा घेतील.
सुब्रह्मण्यम हे 1987 च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी आहेत. जून 2018 मध्ये त्यांना प्रतिनियुक्तीवर जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आले होते. त्यानंतर 30 जून रोजी अनूप वाधवन यांच्या निवृत्तीनंतर मे 2021 मध्ये त्यांची भारत सरकारचे वाणिज्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणून काम केलेले ते अनुभवी अधिकारी आहेत. सुब्रह्मण्यम 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर इंडिया टेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे (आयटीपीओ) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर नियुक्ती करण्यात आली होती.