वारणानगर / दिलीप पाटील
ख्रिश्चन धर्मियांची पंढरी अशी ओळख असलेल्या कोडोली ता. पन्हाळा येथे नाताळ उत्सव निमीत्त चर्चमध्ये घेतलेल्या प्रार्थनेतून देशासह जगात शांतता प्रस्थापित होऊन सुखसमृध्दी येऊदे असे साकडे प्रभू येशुला घालण्यात आले.आज गुरुवार दि.२५ रोजी सकाळी नाताळ उत्सवास शानदार प्रारंभ झाला हजारो भाविक भक्तांनी यावेळी चर्चमध्ये प्रभू येशूंचे दर्शन घेतले
कोडोलीतील ख्रिश्चन चर्चचे धार्मिक स्थळ १०३ वर्षाचे जुने आहे.कोडोलीसह परिसरातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातून हजारो भाविक नाताळ निमित्त दाखल झाले आहेत.परिसरातील हा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा एकमेव उत्सव आहे. गत दोन वर्ष कोरोनामुळे हा उत्सव मर्यादित स्वरूपात झाला होता त्यामुळे यावर्षी नाताळ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे.
नाताळ निमित्त मुख्यचर्च मध्ये सकाळी १० वा. प्रभू येशूच्यां संदेशाचे वाचन होऊन उत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.दुपारी व रात्री उशीरापर्यंत धार्मिक विधी, प्रार्थना, बायबल ग्रंथाचे वाचन,क्वायर ग्रुपली भक्तीगीते आशा कार्यक्रमातून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने व्यापून गेला होता. दिवसभर इच्छापूर्ती झालेल्या व दानशूर भक्ताकडून दान रूपात आलेल्या वस्तू पदार्थाचा लिलाव करून हे पवित्र दान वाटण्यात आले तसेच गोरगरीब नागरिकांना तसेच निराधार विधवा महिलांना कपडे,वस्तूचे दान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.पिशवी, बोरपाडळे,भाडळे,काखे, बच्चे सावर्डे, देवाळे,सरूड, तळसंदे, वाठार या चर्च क्षेत्राना ट्रस्टच्या वतीने भेटी देण्यात आल्या.नाताळ यात्रेमुळे यांत्रीक पाळणे, तसेच विविध प्रकाराच्या मनोरंजनाचे खेळ, खाद्य, खेळणी,प्रसादाचे स्टॉल याठिकाणी मोठी गर्दी दिसून येत होती.
आ. विनय कोरे,गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, जिल्हा परिफ्देचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, शाहूवाडी विभागाचे प्रभारी पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड, फौजदार सागर पवार, श्री. बारामते, कोडोली च्या सरपंच गायत्री पाटील, उपसरपंच माणिक मोरे, ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण, सर्व सदस्य, तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी यांनी यावेळी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केसीसी व कोडोली चर्च
प्रेस्बीटेरियनच्या माध्यमातून या भव्य यात्रेचे नियोजन करण्यात आले.रेव्ह.एस.आर. रणभिसे, सेक्रेटरी बी.के. चोपडे, सहा. सेक्रेटरी डॅमीयल गायकवाड, खजिनदार दिपक चोपडे, अब्राहम एस. काळे, आर.एन. सुर्यवंशी,अशोक काळे, बाबूराव चोपडे,राजेद्र जाधव, दिनकर चोपडे,अजित लोकरे, राजू पटाणे,सुमन काळे, संगीता चोपडे,संगीता पोवाद,उपाध्यक्ष रेव्ह. आशुतोष आवळे, सेक्रेटरी शमुवेल गायकवाड,खजिनदार दत्ता महापुरे, नितीन चोपडे, बी.वाय. चोपडे,डॅनीयल माने. बाजीराव चोपडे,अनिल महापुरे, सौ. शारदा चोपडे, सौ. वैशाली महापुरे यासह मान्यवर हा उत्सव पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.