तेरा बिगरगोमंतकीयांना अटक
पणजी : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या सांत इनेझ येथील बनावट कॉल सेंटरचा पणजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका महिलेसह 13 बिगरगोमंतकीय संशयितांना अटक केली असून आणखी तिघा जणांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. संशयितांकडून मोबाईल, संगणक, रक्कमेसह सुमारे 30 लाख ऊपयांचे सामान जप्त केले आहे. संशयितांच्या विरोधात भादंसंच्या कलम 419, 420, 120 (बी) तसेच आयटी कायदा कलम 66 (सी), 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. काल शुक्रवारी पणजी पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निधीन वाल्सन बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक निखील पालेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. सांत इनेझ येथील सिल्विया हाईट्स बिल्डिंगच्या 7 व्या मजल्यावर बनावट कॉल सेंटर सुऊ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये तपन शाह (42, अहमदाबाद, गुजरात,) जयमीन मिस्त्राr प्रफुल्लभाई (27, अहमदाबाद गुजरात), मिलिंद दिनेश पॅंडी (31 अहमदाबाद, गुजरात), विशाल आयमभाई (20 अहमदाबाद गुजरात), संदीप सिंग रंगर (24 डेहराडून, उत्तराखंड), प्रियांक शाक्य (30 डेहराडून, उत्तराखंड), कुणाल नानकू चौहान (20 पालघर, महाराष्ट्र), लेमसेपी संगता (27 नागालँड), एलन मॅथ्यू (25 वसई पूर्व, महाराष्ट्र), राजीव राणा (23 दिमापूर, नागालँड), रिजू बर्मन (25 दिमापूर नागालँड), डेव्ह शिवम (27 अहमदाबाद, गुजरात), कबीर सिंग खालसा (32 गुजरात), काजोल सुवर्णा (24 डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र,), मिहीर देसाई (अहमदाबाद, गुजरात) हा या प्रकरणातील मुख्य संशयित आहे तर पृथुश प्रजापती (अहमदाबाद, गुजरात) याने हा गुन्हेगारी कट रचला होता.