वृत्तसंस्था/ हांगझाऊ
भारताचा कॅनोईंगमधील खेळाडू नीरज वर्माने तसेच बिनिता चानू आणि गीता पार्वती यांच्या संघाने शनिवारी आशियाई खेळांतील अनुक्रमे पुऊषांच्या 1000 मीटर एकेरी कॅनोईंग आणि महिलांच्या 500 मीटर कयाक दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुरुषांच्या 1000 मीटर एकेरी कॅनोईंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नीरजने 4:31.626 मिनिटे अशी वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली. नंतर, महिलांच्या 500 मीटर कयाक स्पर्धेच्या दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत बिनिता आणि गीता यांनी 2:07.036 मिनिटांची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवले. 2 ऑक्टोबरला अंतिम फेरी होणार आहे.
आशियाई खेळांत 30 पासून सुरू झालेली कॅनोइंग स्पर्धा 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. स्प्रिंट स्पर्धा 3 ऑक्टोबरपर्यंत चालतील, तर स्लॅलम शर्यती 5 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत होतील. आशियाई खेळांमध्ये भारताचे 17 खेळाडू कॅनोइंग स्पर्धांमध्ये उतरलेले असून चार स्लॅलम आणि 13 स्प्रिंट स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत.