वृत्तसंस्था/ युमेग (क्रोएशिया)
स्पेनचा कार्लोस अल्कारेझने 2022 च्या टेनिस हंगामात एकेरीचे 40 सामने जिंकले आहेत. येथे सुरू असलेल्या क्रोएशियन खुल्या क्लेकोर्ट आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी अल्कारेझने स्लोवाकियाच्या गोम्बॉसचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
2021 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱया अल्कारेझने गोम्बॉसचा 6-2, 6-3 असा पराभव करत चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील आपला एकेरीतील 40 वा सामना जिंकला आहे. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात अल्कारेझने क्लेकोर्टवरील स्पर्धेत 25 सामने जिंकले असून तीन सामने गमविले आहेत. आता या स्पर्धेत अल्कारेझ आणि अर्जेंटिनाचा बॅगनिस यांच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.