प्रतिनिधी, रत्नागिरी
देवरूख येथे जागेचे बनावट दस्तऐवज तयार करून जमिन मालकाची फसवणूक करणारे बिल्डर तसेच बनावट नोटरी करून देणाऱ्या वकिलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रकांत शंकर लिंगायत (रा. देवरूख) असे या जमीन मालकाचे नाव आहे. त्यांनी दाखल केलेल्या तकारीनुसार देवरूख पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. एकूण 6 जणांनी फसवणूक केल्याची तक्रार लिंगायत यांनी केली आहे.
योगेश गंगाराम शिवगण (रा. दादर मुंबई), संतोष पांडुरंग कदम (रा. नायगांव दादर), अनंत दत्ताराम रहाटे (रा. काळाचौकी मुंबई), हरेश रामचंद्र मांजरेकर (रा. परेल मुंबई), तेजस बदीयानी (रा. पनवेल) व नोटरी करणाऱ्या वकिल सुनिता राम पाटील (रा. बेलापूर नवीमुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित आरोपी योगेश,संतोष अनंत रहाटे व हरेश मांजरेकर हे यश डेव्हलपर्स कंपनी चालवतात अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
चंद्रकांत लिंगायत यांनी दाखल केलेल्या तकारीनुसार दिनांक 26 ऑक्टोबर 2010 रोजी देवरूख येथील 12 गुंठे जमीन लिंगायत यांनी खरेदीखताने विकत घेतली होती. ही जमीन लिंगायत यांनी 16 मे 2018 रोजी करारपत्राने यश डेव्हलपर्सला डेव्हलपमेंट साठी दिली. मात्र, संशयित आरोपी यांनी लबाडीने व हेतुपूर्वक ड्राफ्ट व नोंदणी केलेला दस्त यामध्ये तपावत केली. यापकरणी लिंगायत यांनी पुन्हा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करण्याचा सल्ला विकासकाला दिला. त्यानंतरच प्रत्यक्ष काम करण्यासाठी मुख्यत्यारपत्र दिले जाईल असे लिंगायत यांच्याकडून बजावण्यात आले होते.असे असतानाही जमीन मालक असलेल्या लिंगायत यांच्याकडून काम करण्यासंदर्भात मुखत्यारपत्र न घेता यश डेव्हलपर्स यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. याबाबत जमीन मालकाकडून तपासणी केली असता 14 जून 2019 रोजी फॉर्म बी ऍफिडेव्हिट कम डिक्लरेशन अशा मजकुरावर खोटी सही केलेला दस्त महाराष्ट्र इस्टेट ॲथॉरिटीवर (महारेरा) अपलोड केला असल्याचे आढळून आल़े.
जमीन मालक म्हणून आपली बनावट सही करून प्रोजेक्टला आपली मान्यता असल्याचे भासवून रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले अशी तक्रार लिंगायत यांनी केली होती. तरी विकासकाने फॉर्म बी हा बनावट दस्त तयार करून फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच स्वतच्या आर्थिक लाभासाठी बनावट दस्तऐवज तयार केल्यापकरणी पोलिसांनी संशयित आरोपी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास देवरूख पोलिसांकडून करण्यात येत आह़े