प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. निसर्गात उपलब्ध असणाऱया साहित्याचा वापर करून इंजिनिअरिंग मॉडेल्स तयार करण्यात आली. प्लास्टिकमुक्त मॉडेल्स तयार करण्याकडे भर होता.
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने कॉलेज परिसराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱयांनी पुढाकार घेतला. प्लास्टिक मुक्तीसाठी काही पोस्टर्सही तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकचे टिफीन खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले. प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. सुरेश, प्रा. नवीद, प्रा. मानी, प्रा. बाळाप्पा, प्रा. अनुज देशपांडे, प्रा. बिदरी व एनएसएसचे सदस्य उपस्थित होते.