रायगड प्रतिनिधी
पेण (जि.रायगड) काही अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या पेशवे पेट्रोल पंपा समोर बुधवारी रात्री १० च्या सुमारास खेड वरून मुंबईकडे जाणाऱ्या इको कारला एका सिमेंट मिक्सर ट्रकने मागील बाजू कडून जोराने धडक दिल्यामुळे ट्रक मधील ७ प्रवासी गंभीर जखमी झाले यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेण पासून काही अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी रात्री १० वाजता मारुती इको कार खेड वरून मुंबईच्या दिशेने जात असताना मागील बाजूने सिमेंट मिक्सर ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात दीपक दत्ताराम उतेकर (कार चालक) (३३) रा खेड . जिल्हा रत्नागिरी, प्रणाली विश्वास सावंत (४५ रा. सांताक्रुज मुंबई,) नम्रता प्रशांत कांबळे (२९ रा.करंजाडे – पनवेल) वैशाली सुहास शिगवण, (३५, रा. सांताक्रुज, मुंबई, ) ॠषभ असीम अधिकारी,( १०, रा. नालासोपारा मुंबई,) वनिता वसंत शिगवण (६०, राहणार सांताक्रुझ,) आरोही सुहास शिगवण ( १० राहणार सांताक्रुझ) हे सर्व गंभीर जखमी आहेत. अपघाताची तीव्रता पाहिल्यानंतर या अपघातामध्ये प्रवासी दगावण्याची शक्यता वाटत होती परंतु सुदैवाने कार मधील सर्व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप झाली होती. अपघात झाल्याचे कळताच अपघातग्रस्तांचे वाली, देवदूत कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी पनवेल एम. जी. एम. रुग्णालय येथे हलविण्यात आले. पेण वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी जावून दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.