मुंबई
जीएसटी करात कपातीच्या आशेने विविध कंपन्यांचे समभाग शेअरबाजारात बुधवारी वधारताना दिसले. अंबुजा सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा यात समावेश होता. सरकार सिमेंटवर आकारण्यात येणाऱया 28 टक्के जीएसटी करासंबंधी फेरआढावा घेणार असल्याची बातमी आहे. या बातमीचा परिणाम समभागांवर सकारात्मक दिसला. अंबुजा सिमेंटस, इंडिया सिमेंटस् आणि हाइडलबर्ग सिमेंट इंडिया यांचे समभाग शेअरबाजारात 3 टक्के इतके वाढले होते.