आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन : 17 पासून आयुष्मान कार्डचे वितरण
बेळगाव : आयुष्मान भव: या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य अभियानचा शुभारंभ खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील बिम्स महाविद्यालयात याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी बिम्सचे संचालक डॉ. अशोक शेट्टी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार इराण्णा कडाडी होते. प्रत्येकाला आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा, सरकारच्या आरोग्य शिबिराची माहिती घरोघरी पोहोचावी, यासाठी आयुष्मान भव: अभियानाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले. या योजनेतून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन सदृढ भारत निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन इराण्णा कडाडी यांनी केले. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी ‘आयुष्मान अॅप की’द्वारे 3.0 अभियान असून सरकारच्या आरोग्य सुविधांचा गुच्छ आहे. या माध्यमातून आरोग्य शिबिरे तर दि. 17 पासून आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. व्ही. शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब पाटील, आरएमओ डॉ. सरोज तिगडी, आयुष्मान भारत विभागाचे डॉ. व्ही. डी. डांगे, कुष्ठरोग नियंत्रक डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याणचे डॉ. विश्वनाथ भोवी, शिक्षणाधिकारी बसवराज यलिगार, तालुका आरोग्याधिकारी शिवानंद मास्तीहोळी आदी उपस्थित होते.