न्हावेली / वार्ताहर
गौरी गणपती सणाच्या निमित्ताने गावोगावी आलेले चाकरमानी परतू लागले आहेत. मात्र कोकण रेल्वेचा कायमस्वरुपी गाड्यांना प्रचंड गर्दी होत असून कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खास गाड्यांची सुविधा निर्माण करायला हवी जादा पॅसेंजर गाड्या देखील सोडण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.तुतारी एक्सप्रेस आणि सावंतवाडी दिवा हाऊसफुल्ल तसेच कोकणकन्या एक्सप्रेसला देखील प्रचंड गर्दी होती.त्यामुळे प्रवाशांची गरज लक्षात घेऊन कोकण रेल्वेने या मार्गांवर खास गाड्या सोडून समाज माध्यमातून गाड्यांची माहिती देण्याची आवशक्यता निर्माण झाली आहे.
शाळेच्या सुट्ट्या संपण्याच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी परतीच्या प्रवाशाला लागले असून अनेकांकडे तिकीट नाहीत ते जनरल तिकीट काढून पॅसेंजर डब्यामध्ये बसत आहेत त्यामुळे खास तुतारी एक्सप्रेस सारखी दुसरी एखादी सावंतवाडीतून एक्सप्रेस सोडावी म्हणजे सर्व स्थानकांना ती जोडली जाऊन चाकरमानी प्रवासी मुंबईत सुखरुप पणे जातील सद्या प्रचंड गर्दी रेल्वेमध्ये असल्याने मिळेल त्या जागेवर बसून चाकरमानी जात आहेत त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे रेल्वे चार ते पाच तास उशिराने धावत आहेत त्यामुळे कोकण रेल्वेने सात दिवसांचे गणपती विर्सजनाच्या नंतर आठव्या दिवसांपासून खास पॅसेंजर गाडीची सोय करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.