कार्वे, वार्ताहर
Chandgad Shiv Sena join Eknath Shinde Group : चंदगड तालुक्यातील शिवसेनेला पडणार खिंडार या मताळ्या खाली दै. तरुण भारत ने १९ जुलै रोजी सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली. ती बातमी आज खरी ठरली आहे. चंदगड तालुक्यातील शिवसेनेचा एक गट आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाला आहे. मुंबईत दस्तुर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या गटाने भेट घेऊन त्यांच्या समक्ष त्यांनी गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात घडलेल्या सत्या नाट्याचा परिणाम चंदगड तालुक्यातील शिवसेनेवर होताना दिसत आहे. तालुक्यातील शिवसेनेत बाहेरून दिसणारी एकी अंतर्गत वादातून ढवळून निघाली होती. यातील एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काम करण्यास उत्सुक होता. दैनिक तरुण भारत ने अशाच मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे या बातमीची चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे.
दि.२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नंदनवन या निवासस्थानी चंदगड तालुक्यातील पदाधिकारी यानी त्यांची भेट घेऊन प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चंदगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत तासभर तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या व चंदगड तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही आशी गव्ही दिली. ल वकरच चंदगड तालुक्यात जाहीर मेळावा घेऊ यासाठी उद्यापासून कामाला लागा असे आदेश दिले.
हेही वाचा- शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर;मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार?
तुम्ही तालुक्यात पक्ष बांधनी मजबूत करा तुम्हाला एक रुपयाही निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे तालुकाप्रमुख कल्लाप्पा निवगिरे यांनी दैनिक तरुणभारतशी बोलताना सांगितले. यावेळी माजी तालुका प्रमुख दिवाकर पाटील , तालुका प्रमुख कल्लापा निवगीरे , उपतालुका कीरण कोकीतकर, दत्ता पाटील, विभाग प्रमुख व शिनोळी सेवा सोसायटी चेअरमन विनोद पाटील, शिनोळी बुद्रुक चे सरपंच नितीन पाटील, उपसरपंच बंडू गुडेकर , माजी उपतालुका प्रमुख ताजूदिन मंगसुळी, विभाग प्रमुख विश्वास पाटील, नामदेव बिर्जे, रघुनाथ पाटील, राजू मुदगेकर , शिवाजी पाटील, आमर प्रधान, आमर साळवी, महादेव जांबळे,व शिवसैनिक उपस्थित होते.