वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कथित कौशल्य विकास घोटाळ्याचा आरोप असणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जामीन मिळविण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नायडू हे तेलगु देशम पक्षाचे नेते आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांची जमीन याचिका फेटाळली होती. तसेच आपल्यावरील आरोप रद्द करावेत अशीही मागणी त्यांनी केली होती. तीही उच्च न्यायालयाने फेटाळली.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका सादर केली आहे. नायडू यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. पोलिसांनी या आरोपांची चौकशी चालविली आहे. साक्षीदारांचे म्हणणे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या स्थितीत आरोप रद्द करणे शक्य नाही. तसेच त्यांना जामीनही संमत करणे शक्य नाही, अशी कारणे उच्च न्यायालयाने दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांची याचिका गुंटूर प्रमोद कुमार या वकीलांनी सादर केली.