बेळगाव : येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळवारी होणाऱ्या अखिल भारतीय धनगर समाज मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी मंगळवारी सकाळी 7 ते मेळावा संपेपर्यंत शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. निपाणी, अथणी, चिकोडी, संकेश्वर, यमकनमर्डीहून मेळाव्यासाठी येणारी वाहने निसर्ग ढाब्यासमोरील सर्व्हिस रोडवरून श्रीनगर गार्डन, शिवबसवनगर परिसरात जनतेला उतरवून हिंडाल्को मैदानावर उभी करायची आहेत. गोकाक, कणबर्गीहून मेळाव्यासाठी येणारी वाहने कनकदास सर्कल, अशोकनगर मार्गे येऊन शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर उभी करायची आहेत. बागलकोट, रामदुर्ग, यरगट्टीहून येणारी वाहने कनकदास सर्कल, अशोकनगर, शिवबसवनगर मार्गे केपीटीसीएल पार्किंगस्थळावर उभी करायची आहेत.
वेंगुर्ला, सावंतवाडी, सुळगाकडून मेळाव्यासाठी येणारी वाहने हिंडलगा फॉरेस्ट नाका, बॉक्साईट रोड, हिंडलगा गणेश मंदिर, महात्मा गांधी सर्कल, हनुमाननगर रोडवरून, नेहरुनगरजवळील रे•ाr भवनजवळ असणाऱ्या मैदानावर उभी करायची आहेत. खानापूर, कारवार, हल्याळहून येणारी वाहने सरदार्स मैदानावर उभी करण्याची सूचना करण्यात आली आहे. चिकोडी, निपाणी, यरगट्टी, बागलकोट, विजापूरला जाणारी व त्या गावाहून येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस किल्ला तलाव, सम्राट अशोक चौक, लेकव्ह्यू इस्पितळ, कनकदास सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर, हिरेबागेवाडीकडे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस व इतर वाहने जुन्या पी. बी. रोडवरून अलारवाड सर्व्हिस रोडमार्गे राष्ट्रीय महामार्गावर जातील. खानापूरला जाणारी वाहतूक मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोडवरून सोडण्यात येणार आहे.