शिव-बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस नियोजन : पोलीस प्रशासनाकडून खबरदारी
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवार दि. 3 मे रोजी होणारी बसव जयंती व बुधवार दि. 4 रोजी होणाऱया शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन दिवस वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
मंगळवारी बसव जयंतीची मिरवणूक आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी 8 पासून केएलई रोड, कोल्हापूर सर्कलहून चन्नम्मा सर्कलकडे येणारी वाहने व्हाया जंक्शनजवळ वळवून लक्ष्मी कॉम्प्लेक्स, सदाशिवनगर, बँक ऑफ महाराष्ट्र, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, महात्मा गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य सर्कल मार्गे ग्लोब थिएटरकडे वळविली आहे.
चन्नम्मा सर्कलहून कॉलेज रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौकाकडे जाणारी वाहने गणेश मंदिरापाठीमागून क्लब रोड, महात्मा गांधी सर्कलमार्गे ग्लोब थिएटरकडे वळविण्यात येणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकापासून खडेबाजारमार्गे शनिवारखूटकडे येणारी वाहने आरटीओ सर्कल, जुन्या पी. बी. रोडवरून वळविण्यात येणार आहेत. जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोलपंपहून नरगुंदकर भावे चौक, कमळीखूटकडे येणारी वाहने रविवारपेठ, पिंपळकट्टाहून पाटील गल्ली, स्टेशन रोडमार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहेत.
चन्नम्मा सर्कलहून काकतीवेस, शनिवारखूट, गणपत गल्ली, कमळीखूट, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोडच्या दोन्ही बाजूने बुधवारी सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी असणार आहे. जिथे दोन मार्ग आहेत त्या परिसरात एका मार्गाचा वापर मिरवणुकीसाठी करण्यात येणार आहे.
बुधवार दि. 4 मे रोजी शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 2 ते मिरवणूक संपेपर्यंत चन्नम्मा सर्कलहून कॉलेज रोडमार्गे खानापूर रोडवर जाणारी वाहने क्लब रोड, महात्मा गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कतपार्कमार्गे ग्लोब थिएटरजवळून खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहेत.
मिरवणूक मार्गावर वाहने उभी करण्यास निर्बंध
जिजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, कमळीखूट परिसरात येणारी वाहतूक जिजामाता सर्कलहून जुन्या पी. बी. रोडवर वळविण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर दुपारी 2 पासून मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास निर्बंध असणार आहे. नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडियामार्गे कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून येणारी वाहतूक एसपीएम रोड, भातकांडे स्कूल क्रॉसपासून कपिलेश्वर कॉलनीमार्गे वळविण्यात येणार आहे.
जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजीस्टिक, भातकांडे स्कूलमार्गे कपिलेश्वर ओव्हरब्रिजकडे येणारी वाहने शिवाजी उद्यानापासून बँक ऑफ इंडिया क्रॉस, महात्मा फुले रोडवर वळविण्यात येणार आहेत. जुना पी. बी. रोड, यश इस्पितळ, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिरमार्गे ओव्हरब्रिजकडे येणारी वाहने भातकांडे स्कूल जवळून तानाजी गल्ली, रेल्वेगेटकडून वळविण्यात येणार आहेत.
गुड्सशेड रोडहून कपिलेश्वर रोडकडे येणारी वाहने एसपीएम रोडवरून मराठा मंदिर गोवावेस सर्कलकडे वळविण्यात येणार आहेत. खानापूर रोड, बीएसएनएल कार्यालय, स्टेशन रोड, गोगटे सर्कलहून हेड पोस्ट ऑफिसकडून शनिमंदिरकडे जाणारी वाहतूक ग्लोब थिएटरहून वळविण्यात येणार असून शर्कतपार्क, केंद्रीय विद्यालय क्र 2, अरगन तलाव, क्लब रोडमार्गे वळविण्यात येणार आहे.