मडगाव : गोव्याचा बुद्धिबळपटू ऋत्विज परब आता आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) खेळाडू बनला आहे. 2400 इलो गुण झाल्याबद्दल त्याला हा किताब प्राप्त झाला. आर्मेनियात झालेल्या सागकादझोर ओपन 2023 बुद्धिबळ स्पर्धेत त्याने बुद्धिबळातील महत्वपूर्ण पल्ला गाठला. त्याने या स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर सेथूरामनला बरोबरीत ठेऊन आवश्यक रेटींग मिळविली होती. त्यापूर्वी हल्लीच अबू धाबीत झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत आयएमसाठी आवश्यक तिसरा नॉर्म मिळविला होता. ऋत्विज परबने 2015 मध्ये बँकाकमध्ये झालेल्या स्पर्धेत आयएमचा पहिला, 2018 मध्ये जम्मूत झालेल्या राष्ट्रीय सीनियर बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा नॉर्म मिळविला होता. त्यानंतर मात्र त्याला आयएमच्या किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म मिळविण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागली. यापूर्वी आयएम किताबचे मानकरी ग्रँडमास्टर अनुराग म्हामल, रोहन आहुजा, अमेया अवदी, ग्रँडमास्टर लियॉन मेंडोंसा, भक्ती कुलकर्णी व नितीश बेलुरकर आहेत. ऋत्विजच्या या यशाचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महंश कांदोळकर, सचिव आशेष केणी तसेच व्यवस्थापकीय मंडळातील अन्य सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleलुईझिन फालेरो यांचे पुस्तक देईल इतिहासाची साक्ष : पिल्लई
Next Article तेजल मनोहर पेडणेकरची मदतीसाठी हाक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment