तळकोकणासाठी मुख्यमंत्री काय देणार ?
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बळीराजासाठी कोणतं पॅकेज देणार ?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 जून रोजी सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टर द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सावंतवाडी ऐवजी कुडाळ येथे याच दिवशी घेतला जाणारआहे. तर सावंतवाडीतील संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. सिंधुदुर्गात पावसाळा सुरू होण्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच मिरगच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे बळीराजाला काय पॅकेज देतात ? आणि सिंधुदुर्ग आणि कोकणाबाबत विकासात्मक दृष्ट्या त्यांची भूमिका काय असणार? हे त्यांच्या दौऱ्यात स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याबाबत शिवसेनेच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.