मडगांव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत आढावा घेतला. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, वित्त सचिव, क्रीडा खात्याचे संचालक रोहित कदम तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. एकूण 27 ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन होणार असून यात 43 खेळांचा समावेश आहे. कुठला क्रीडा प्रकार कुठे घेण्यात येणार आहे, यावर सविस्तर चर्चा या आढावा बैठकीत घेण्यात आली. शालेय परीक्षा ऑक्टोबरपूर्वी घेण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा लाभ घेता येईल, यावर सर्वांचे बैठकीत एकमत झाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी किमात 2700च्या आसपास स्वंयसेवकांची आवश्यकता आहे. स्वंयसवेकांची पूर्तता कशी करता येईल यावरही सविस्तर चर्चा झाली. सध्या शिक्षण खात्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. स्पर्धेला काही महिनेच शिल्लक असल्याने राज्य सरकार, भारतीय ऑलिम्पिक संघटना, क्रीडा खाते तसेच गोवा क्रीडा प्राधिकरण समवेत नियमित बैठका घेणार आहेत. आयओचे शिष्टमंडळही राज्यात आखल झाले असून तेही स्पर्धेच्या तयारीबाबत आढावा घेत आहेत. लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परत एकदा या स्पर्धेच्या तयारीविषयी बैठकीत आढवा घेणार आहेत.
Previous Articleखोल लक्ष्मीनारायण देवस्थानच्या ज्येष्ठ महाजनांचा सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.