चिकोडी प्रांताधिकाऱयांनी बजावला आदेश : मटका, जुगाराविरुद्ध कारवाई तीव्र
प्रतिनिधी / बेळगाव
मटका, जुगाराविरुद्ध जिल्हा पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. गुरुवारी निपाणी येथील आणखी दोघा जणांना तडीपार करण्याचा आदेश चिकोडीच्या प्रांताधिकाऱयांनी बजावला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. मटका, जुगार, बेकायदा दारू विक्री प्रकरणात सहभागी असणाऱयांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. पोलीस दलाकडून यासंबंधी प्रांताधिकाऱयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
गुरुवारी चंद्रकांत शंकर वड्डर (रा. अक्कोळ, ता. निपाणी) याला 9 महिन्यांसाठी कोलार जिल्हय़ात तडीपार करण्यात आले आहे. तर संजय चंद्रकांत पराकट्टी (रा. जमादार प्लॉट, निपाणी) याला रामदुर्ग तालुक्मयात तडीपार केल्याचा आदेश चिकोडीच्या प्रांताधिकाऱयांनी बजावला आहे.
चंद्रकांत वड्डर याच्यावर 36 मटका व जुगाराची प्रकरणे आहेत. बेकायदा दारू विक्रीचे एक प्रकरण आहे. संजय पराकट्टी हा चार गुन्हय़ांत सहभागी असल्याचे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱयांनी
सांगितले.