वार्ताहर /कुडाळ
कुडाळ तालुक्यातील तेंडोली- भोमवाडी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेच्या मुलांनी सोमवारी सकाळी साक्षरता सप्ताह कार्यक्रमा निमित्त गावात जन जागृती रॅली काढली. साक्षरता सप्ताह कार्यक्रम १ ते ८सप्टेंबर या कालावधीत प्राथमिक शाळामध्ये राबविला जात आहे.या रॅलीत अंगणवाडीची, पहीली ते पाचवीची मुले सहभागी झाली होती. प्रत्येक घराघरात शिक्षणाबद्दल जन जागृती निर्माण करण्यासाठी साक्षरता सप्ताहा निमित्त ही रॅली काढण्यात आली होती.मुलांनी “साक्षरतेचा एकच मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र”, “देशाचा होईल विकास घेऊन साक्षरतेचा ध्यास”, “ज्ञान ज्योती लावू घरोघरी ,दूर करू निरक्षरता सारी” अशा घोषणा दिल्या.
यावेळी मुलांनी आताची पिढी निरक्षर न राहता साक्षर बनली पाहिजे. प्रत्येकाच्या घराघरात शिक्षण पोहचले पाहिजे. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर शिक्षण खूप महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक घरातील व्यक्ती ही साक्षर बनली पाहिजे. शिक्षणा शिवाय पर्याय नाही. पालकांनी आपल्या मुलांना निरक्षर न बनवता साक्षर बनविले पाहिजे. असा संदेश देण्यात आला.यावेळी तेंडोली केंद्राचे केंद्र प्रमुख वासुदेव मराठे, मुख्यापिका योगिता पवार, शिक्षिका प्रज्ञा परूळेकर, अंगणवाडी सेविका दिक्षा परूळेकर,अंगणवाडी मदतनीस रसिका राऊळ, अंकुश राऊळ, रवींद्र तेंडोलकर आदी पालक उपस्थित होते.