आनंदाची पातळी वाढते, एंक्झाइटीची समस्या होते दूर
जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या नव्या संशोधनानुसार जी मुले सामुदायिक सेवेत सामील असतात, त्यांची प्रकृती उत्तम असते. सामुदायिक सेवेमुळे मुले समाजात स्वत:चे योगदान देतात, तसेच यामुळे त्यांची आनंदाची पातळी देखील वाढते.
शाळा, धार्मिक संघटना किंवा अन्य कुठल्याही सामुदायिक केंद्रात ज्या मुलांनी काम केले आहे, त्यांना लाभच झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. या संशोधनाची आकडेवारी मुलांच्या आरोग्यासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आणणारी आहे. ज्या मुलांनी सामुदायिक सेवेत भाग घेतलेला नाही, त्यांच्या तुलनेत काम करणाऱ्या 34 टक्के मुलांची प्रकृती अत्यंत उत्तम राहिली, तर 66 टक्के मुलांची प्रकृती चांगली राहिली असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
या सर्वेक्षणात अमेरिकेतील 6-17 वयोगटातील 50 हजारांहुन अधिक मुलांना सामील करण्यात आले होते. सर्वेक्षणात सामील मुलांमध्ये 8 टक्क्यांपेक्षा अधिक मुले महानगरांमधील होती. मागील काही वर्षांमध्ये तरुण-तरुणींमध्ये नैराश्य, एंक्झाइटी आणि आत्महत्येची प्रवृत्ती वाढली आहे. अशा स्थितीत हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या मुलांनी समाजसेवा केली होती, त्यांच्यात एंक्झाइटी अन्य मुलांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी दिसून आली आहे. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 11 टक्के मुलांमध्ये एंक्झाइटी दिसून आली, तर 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 19 टक्के मुलांमध्ये एंक्झाइटीची समस्या आढळून आली आहे.