ग्युयांगझोयू (मेक्सिको)
येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील ग्युयांगझोयू खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चीनच्या वेंग झियूने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना लिनेटिचा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील झियूचे हे पहिले विजेतेपद आहे.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात झियूने लिनेटिचा 6-0, 6-2 असा सरळ सेटसमध्ये पराभव केला. या स्पर्धेत जेतेपद मिळविणारी 22 वर्षीय वेंग झियू ही चीनची चौथी महिला टेनिसपटू आहे. या स्पर्धेत 2018 साली चीनच्या वेंग क्यूयांगने, 2013 आणि 2017 साली चीनच्या झेंग शूईने तर 2004 साली ली ना ने विजेतेपद मिळविले होते.