ओटवणे प्रतिनिधी
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाचा उपक्रम
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम रविवारी राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद घेतला. या स्वच्छता मोहिमेत झाडीने व्यापलेल्या किल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुज यांची स्वच्छता करण्यात आली.
सात महिन्यापूर्वी २४ ऑक्टोंबरला या किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने मराठा आरमार दिन साजरा करीत छत्रपती शिवरायांच्या या आरमारी दुर्गास मानवंदना देण्यात आली होती. तसेच या किल्ल्याची स्वच्छता व सजावट करण्यात आली होती. त्याचवेळी टप्याटप्याने सर्वांच्या सहकार्याने निवती किल्ला स्वच्छता संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार या किल्ल्यावर दुसऱ्या टप्प्यातील ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी संतोष पारधी यांनी सॉ कटर उपलब्ध करून दिला. सर्व सहभागी मावळ्यांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार मानण्यात आले.
या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे, शिवाजी परब, योगेश येरम, शितल नाईक, विशाल परब, धोंडी परब, यश परब, सतिश नाईक, सदा घाडी, अक्षय सावंत, मयुरी जोशी आदींनी सहभाग घेतला.