CM Eknath Shinde News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली. या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी उपस्थिती लावली. रायगडावर शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. किल्ले रायगडावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांच नाव देण्याची घोषणा केली. तर प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याचेेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी बोलतान ते म्हणाले की, शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी निधी देणार आहोत. तसेच .लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार विशेष प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.