नवी दिल्ली
कोळसा खाणकामात खासगी कंपन्यांचा वाढता वाटा दिसत असून एमडीओअंतर्गत (खाण विकास आणि ऑपरेटर) सुमारे 80 खासगी कंपन्या यात कार्यरत आहेत 2015 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी वाटप केलेल्या सर्व कोळसा खाणी आणि नवीन कोळसा खाण विशेष तरतुदी कायदा रद्द केल्यानंतर कोळसा खाण क्षेत्राला नव्याने सुरुवात झाली. यामुळे सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रांना विक्रमी संख्येने कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले.
संकलित केलेला डाटा असे दर्शवितो की 780 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन असलेल्या 80 खाणी खासगी एमडीओद्वारे चालविल्या जातात. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना वाटप केलेल्या खाणींचा समावेश आहे. एनटीपीसी, एनएलसी, सेल आणि विविध राज्यांतील वीज निर्मिती कंपन्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे.
कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद अग्रवाल यांनी अलीकडेच 2023-24 साठी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार पुढील काळात कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नांवर भर असणार असल्याचे म्हटले आहे.