नवी दिल्ली
कोळसा मंत्रालयाने मे 2023 मध्ये एकूण कोळसा उत्पादनात भरीव वाढ नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कालावधीत उत्पादन 7.10 टक्क्यांनी वाढून 7.62 टन झाले आहे, जे मे 2022 मध्ये 7.12 कोटी टन होते.
त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एप्रिल-मे दरम्यान एकूण कोळसा उत्पादन 13.84 कोटी टनांवरून वाढून 14.94 कोटी टन झाले. गेल्या महिन्यात, कोल इंडिया लिमिटेडने 5.99 कोटी टन कोळशाचे उत्पादन केले, जे वार्षिक आधारावर 9.54 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगितले जाते.