मुंबई
कोचिन शिपयार्ड कंपनीचा समभाग शेअरबाजारात दुसऱ्या दिवशी तेजीत असताना दिसला आहे. मंगळवारी शेअरबाजारात कंपनीचा समभाग 8 टक्के इतका वाढत 1068 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात कंपनीचा समभाग 983 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 6 महिन्यातील या समभागाचा प्रवास पाहिल्यास या समभागाने 153 टक्के इतका भक्कम परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.