जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
कोल्हापूर प्रतिनिधी
रेशनवर मोफत व नियमित धान्याचे एकत्रित वाटप करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन परिवर्तन संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनातील मागण्या अशा, रेशनवर उशिरा धान्य आल्याने ते लॅप्स होत असल्याने ते ग्राहकांना वेळेवर उपलब्ध करुन द्यावे, मोफत व नियमित धान्य एकाचवेळी देण्यात यावे, लॅप्स झालेल्या धान्य कोटय़ाला मुदतवाढ द्यावी, धान्य गोदामातून वाहन बाहेर पडताच संबंधित् दुकानाच्या मशीनवर धान्यसाठय़ाची माहिती टाकण्यात यावी, कमिशन वाढीबाबत मंत्रीपातळीवर पाठपुरावा करावा. ‘आयएसओ’ मानांकनाबाबत सक्ती करण्यात येऊ नये, नवीन मशीनमध्ये नाव कमी करणे व वाढवणे या सुविधा देण्यात याव्यात, फोर-जी व नेटवर्क बाबत तातडीने सुधारणा कराव्यात, कोरोना काळात मृत्यू झालेल्या रेशन दुकानदारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, आनंदाचा शिधा वाटपाला मुदतवाढ द्यावी, गॅस सिलेंडर वितरणाबाबत परवानगी मिळावी.शिष्टमंडळात अनिल कवाळे, जितू शिंदे, सुधीर फडके, संग्राम जाधव, योगेश हातलगे, प्रकाश पाटील, महेश परीट, संदीप वाडकर, तानाजी हिरुगडे, नारायण कोकरे आदींचा समावेश होता.
.